पुणे : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांमुळे अनेक इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा सांभाळण्याची संधी दिली आहे. यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा कलह पहायला मिळाला. पुणे शहराचे राष्ट्रवादी अध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह ६०० पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर दीपक मानकरांनी पत्रकार परिषद घेत आपली जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे. यावरुन आता रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”मानकर यांना शहराध्यक्षपद देताना मी भगिनी म्हणून मानकर यांच्या पाठीशी उभी होते. पण, त्यांनी असं का केलं मला माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी मानकर यांच्यावर अधिक बोलणे टाळल्याचे पहायला मिळाले आहे.
“राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यात जर तीन जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या असत्या, तर महिला म्हणून मला आमदारकी मिळाली असती. परंतु, दोनच जागा आम्हाला मिळाल्या, पुढच्या वेळी माझा विचार केला जाईल, मला अपेक्षा होती आणि मी मागणी देखील केली होती. महायुती सरकारचे आभार मानते, मला परत एकदा महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आलं”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?
-पुण्यातील ‘या’ चार मतदारसंघाचा पेच काही सुटेना! महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी
-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त
-कसब्यात इच्छुकांकडून ब्राह्मण कार्डची खेळी, भाजप बहुजन उमेदवार डावलणार का? राज्यात वातावरण तापणार