पुणे : बारामतीमधील शारदा प्रांगण येथे बारामती नगरपालिका यांच्या विद्यमाने महिला अर्थिक विकास महामंडळाकडून महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या जिल्हास्तरीय वस्तूचे भव्य प्रदर्शनाचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि काही वेळानंतर लगेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते असे दोन वेळा उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बारामतीतील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेणं टाळल्याचे पहायला मिळाले. यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये श्रेयवाद सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
‘बारामती नगरपालिका आणि शासकीय अधिकारी यांनी मला निमंत्रण दिल्यामुळे मी प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी आले आहे, मला उद्घाटनची वेळ सुद्धा दुपारी चारची दिली होती, मी वेळेवर आले आणि उद्घाटन केलं,मात्र माझ्यानंतर कोणी केव्हा आले आणि उद्घाटन कोणी कुणी केलं हे बाकी मला माहीत नाही, याबाबत तुम्ही प्रशासनाला विचारा’, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
‘मला बचत गटाच्या उद्घाटनासाठी दुपारी चारची वेळ देण्यात आली होती, याबाबतची माहिती कृपया आपण प्रशासनाला विचारावी,मी स्थानिक खासदार म्हणून मला दुपारी चारची वेळ देण्यात आली असल्यामुळे मी दुपारी चार वाजता उद्घाटनासाठी आले आहे. याबाबतचे पत्रही प्रशासनाकडून मला देण्यात आले होते, पत्राचा मान राखून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, जर या प्रदर्शनाचे उद्घाटन दोन वेळा झाले असेल तर मला ही प्रशासनाला याबाबत विचारणा करावीच लागणार आहे’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले
-पुण्यात महिला असुरक्षितच; स्वारगेट प्रकरणानंतर आता आणखी एका तरुणीवर अत्याचार
-पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड