पुणे : पुणे शहरात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातील एका उच्च पदाधिकाऱ्याच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडूनच शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत असलेल्या एका उपशाखेचे नेतृत्व करणाऱ्या शिवसैनिकाने झोल-झाल केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. यावरुन एका दैनिकाने दिलेल्या बातमीचे पोस्टर शिवसैनिकांकडून शहरात लावण्यात आले आहेत. ‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे लवकर हटवा’ अशा आशयाचे बॅनर पुण्यातील शिवसैनिकांनी लावले आहेत. यावरुन शहरात अनेक विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटातील पुण्यातील झोल-झाल करणाऱ्या शिवसैनिकाला आता शिंदेंच्या कार्यालय आणि निवासस्थानावर या नेत्याला नो एन्ट्री करण्यात आली असल्याचे या पोस्टरवरील मजकुरात म्हटले आहे. ‘एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर सुरक्षा भेदून तथा ज्येष्ठ नेत्यांना डावलून शिंदेंच्या गाडीचे स्टेरिंग आपल्या हाती घेत होता. याबाबत शिंदेंच्या कानावर अनेकदा तक्रारी गेल्यानंतरही एक शिवसैनिक म्हणून शिंदेंनी देखील याकडे कानाडोळा केला. मात्र या युवा नेत्याचे इतर उद्योग लक्षात आल्यानंतर कडक शब्दात सुनावण्यात आलं आहे’, अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहे.
या युवा नेत्याचा पराक्रम असा की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी आणि निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी आर्थिक व्यवहार करत होता. या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने शिंदे यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर या नेत्याला नो एन्ट्री करण्यात आली. शिवसेना नेत्यानांही याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे या नेत्याचे झोल-झाल करण्याचे दुकान बंद झाल्याचे पोस्टरमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विजयानंतर हेमंत रासनेंनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आभार; ९० हजार नागरिकांना वाटले पेढे
-पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात पाणीबाणी, कोणत्या भागात कपात?
-भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?
-मावळच्या तरुणांकडून महायुती सरकारला विशेष शुभेच्छा; आकाशात झळकवले बॅनर
-हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?