पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. मविआच्या नेत्यांकडून धंगेकरांच्या पक्षप्रवेशावरुन टीका केली जात आहे. ‘वक्फ बोर्डच्या बोर्डाच्या जमीन प्रकरणांमध्ये रवींद्र धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला’, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर शहराध्य अरविंद शिंदे यांनी देखील टीका केली. संजय राऊत आणि अरविंद शिंदेंनी केलेल्या टीकेवर आता रवींद्र धंगेकरांनी उत्तर दिले आहे. भाजप आणि अजित पवार एकत्र येतील असं आपल्याला वाटलं होतं का? या प्रश्नावर बोलताना धंगेकर मित्रपक्षांवर घसल्याचे पहायला मिळाले आहेत.
‘भाजपमध्ये सगळेच लोक वाईट नाहीत. लोकशाहीमध्ये स्पर्धा असते. राजकारणात तर एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय मोठा होता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं आहेत, असेही सांगितले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं आहे, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.
संजय राऊतांच्या टीकेवर धंगेकर काय म्हणाले?
‘संजय राऊत माझे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मी कामं केलंय, त्यांना वाटतं असेल मी केलेलं चुकीचं तर तो त्यांचा अधिकार आहे. वक्फ बोर्डच्या ज्या जमिनीबाबत चर्चा केली जात आहे. त्या जमिनीचा मी सहावा खरेदीदार आहे. त्या जमिनीवर सरकारी कार्यालयदेखील असून त्याच्या मूळ मालकाला सरकार भाडंही देत आहे. ती जमीन १९६६ पासून वक्फ बोर्डाच्या ताब्यात नाही. या प्रकरणामध्ये मी जर चुकीचा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा’, असे म्हणत धंगेकरांनी राऊतांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिले आहे.
अरविंद शिंदेंच्या टीकेवर धंगेकर काय म्हणाले?
अरविंद शिंदे हे जरी माझ्यावर टीका करत असले तरी मी त्यांचे आभार मानतो. माझ्या चुका झाल्या असतील. मात्र, त्यांनी माझ्यासाठी ३ निवडणुकीत जे कामं केले, त्याबद्दल मी आभार मानतो… मी ते विसरणार नाही, असे धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी; जामीन मिळणार का? न्यायालयात नेमकं काय घडलं?
-‘धंगेकर पुण्याचे वाल्मिक कराड’; काँग्रेस नेत्याची धंगेरकरांवर टीकेची झोड
-मेट्रो मार्गावर आंदोलनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु, न्यायालयात नेमकं काय झालं?
-पुण्यात होणार दोन मेट्रो मार्गिकेचा विस्तार; राज्याने पाठवला तब्बल एवढ्या कोटींच्या निधीचा प्रस्ताव
-लाडक्या बहिणींसाठी आणखी ३६ हजार कोटींची तरतूद पण तरीही २१०० रुपये नाहीच