पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सत्ताधारी पक्षांकडे मतांचा कोटा असल्याने पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. भाजपने भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांना तर शिवसेना (शिंदे गट)ने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्यामुळे नुकताच सेनेत प्रवेश केलेल्या धंगेकर यांना विधान परिषदेची लॉटरी लागणार असल्याची चर्चा जोरदार रंगली. परंतु शिंदेंनी आपल्यासोबत सुरुवातीपासून राहिलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिल्याने धंगेकरांच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं पहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. यासाठी शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. धुळे–नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘बरं झालं पक्ष फुटला, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही’; सुप्रिया सुळेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल
-‘महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
-स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव
-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले