पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याचे पहायला मिळाले आहे. पुण्यातील मुकुंदनगर येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. सांस्कृतिक कला आणि क्रिडा संदर्भातील इमारत महाराष्ट्र मंडळाकडून बांधली जात असून या इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भरत गोगावले हे देखील उपस्थित होते.
काल मुंबईत राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले असून आता या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशातच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे बॅटरी कारमधून एकत्र गेल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गणेश जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग, वाचा एका क्लिकवर…
-Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा
-खाकी वर्दीला कलंक: हुक्का पार्लर चालकाकडून ‘तो’ पोलीस उपनिरीक्षक घेत होता २० हजारांचा हफ्ता
-‘भाजपने पुणेकरांची फसवणूक केली’; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप