पुणे : पुणे शहर परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.१२) बंद राहणार आहे. नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी यासह अन्य ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, शुक्रवारी (दि.१३) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने हा पाणी पुरवठा हळूहळू सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन पुणे पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
स्वारगेट, कोंढवा, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, गोखलेनगर, शहरातील मुख्य रस्ते, कोथरुड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी, बाणेर, बालेवाडी, औंद, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, पाषाण, बावधन, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता.
वडगाव, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरुद्वारा इत्यादी परिसर, कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, लिंबाळकर वस्ती, सुखसागर नगर, कात्रज- कोंढवा रस्ता, अशा भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनो पाणी जपूण वापरा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?
-मावळच्या तरुणांकडून महायुती सरकारला विशेष शुभेच्छा; आकाशात झळकवले बॅनर
-हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?
-‘…तेव्हा कसं गारगार वाटायचं अन् आता…; पहिल्याच भाषणात अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार
-‘मी पुण्याचाच, यावर शिक्कामोर्तब’; चंद्रकात पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर