पुणे : नुकतीच विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून ५ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी १ जागा पुण्याला मिळणार आहे. पुण्याला विधानपरिषदेत आणखी एक जागा मिळणार हे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे दोन्ही नेते विधान परिषदेत आमदारकीसाठी आग्रही आहेत. या दोन्ही नेत्यांपैकी कोणाची वर्णी लागणार की पक्षश्रेष्ठी त्याशिवाय आणखी कोणात्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे विधानसभा निवडणुकीवेळी आग्रही होते. दीपक मानकर यांनी यापूर्वी एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता निवडून नाही तर नाही पण विधानपरिषदेची संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. यावेळी मानकर राजीनामा देण्याच्या तयारीत होते. अजित पवारांनी भेट घेत त्यांची नाराजी दूर केली होती. मानकरांना आमदारकी मिळावी म्हणून त्यांचे समर्थकही मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. ‘आता तरी अजित पवार आपल्याला संधी देतील’, असे त्यांचे म्हणणे असून त्यांचे समर्थक त्यासाठी पवार यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनिल टिंगरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने शहराध्यक्षपद दिले. त्यानंतर झालेल्या लोकसभेसाठी मुळीकांनी आग्रह धरला होता. मात्र, लोकसभेला मुळीकांना शांत बसवत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील मुळीकांचा आग्रह कायम होता. राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे ज्या टिंगरेंनी पराभव केला ते मित्रपक्षात एकत्र आले. तसेच ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला उमेदवारी या फॉर्म्युलानुसार वडगाव शेरीची उमेदवारी पुन्हा सुनिल टिंगरेंना मिळाली. त्यावेळी मात्र, त्याचवेळी त्यांना थेट देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचा शब्द दिला गेला असे सांगण्यात येते. त्यामुळे फडणवीसांनी मुळीक यांना दिलेला शब्द पाळला जाईल जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ
-रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं
-पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?
-गोरे म्हणाले ‘त्या प्रकरणी माझी निर्दोष मुक्तता’, पीडित महिला म्हणाली, ‘ही केस…’
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: नराधम दत्ता गाडेच्या चौकशीत धक्कादायक फोटो आले समोर