पुणे : पुणे शहारामध्ये एकीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे तर अशातच झिका रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे शहरामध्ये आतापर्यंत १०० रुग्ण सापडले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यातच आता झिकाची लागण झालेल्या पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खराडीतील ७२ वर्षीय पुरुष, पाषाणमधील ९५ वर्षीय स्त्री, बाणेरमधील ७८ वर्षीय पुरुष, कोथरूडमधील ६८ वर्षीय पुरुष आणि कर्वेनगरमधील ७६ वर्षीय पुरुष या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील झिका रुग्ण एकूण १०० पैकी ४५ गर्भवती असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली आहे.
डहाणूकर कॉलनी क्षेत्रिय कार्यलयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक २० रुग्ण आढळून आले आहेत. एरंडवणे क्षेत्रिय कार्यालयात १६ रुग्ण सापडले आहेत. घोले रस्ता आणि पाषाण मध्ये प्रत्येकी ९ रुग्ण आहेत. सुखसागरनगर व मुंढवा प्रत्येकी ७, वानवडी ५, कळस ४, कोरेगाव पार्क व आंबेगाव बुद्रुक प्रत्येकी ३, लोहगाव २, विश्रामबागवाडा आणि धनकवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण
-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप
-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला पुणे दौऱ्यावर; ‘या’ मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन
-Assembly Election: महाविकास आघाडीत रस्सीखेच; पुण्यातील ८ जागांवर ठाकरे गटाचा दावा