पुणे : पुण्याची प्रसिद्ध “चितळेंची बाकरवडी” लोक आवडीने घेतात. जगप्रसिद्ध चितळेंच्या बाकरवडीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. चितळे बंधूंच्या नावावर बनावट चितळे बाकरवडीची विक्री केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधु मिळाईवाले यांचे असल्याचे भासवले आणि चितळेंच्या नावाचा गैरवापर करुन ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या ४ वर्षांपासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत. गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडीची बदल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून “चितळे स्वीट होम” नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली.
View this post on Instagram
चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि आमच्या नियमित तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली. खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांच्यासह ग्राहकांची देखील मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या ‘चितळे स्वीट होम’वर पुणे पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३५०, ६६(सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?
-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश
-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश
-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट