पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी जळगाव या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी २०२१ साली तीन गुन्हे दाखल केले होते. पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून भाग्यश्री नवटके त्यावेळी कार्यरत होत्या. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री अंत्यत गुप्तता पाळत हा गुन्हा नोंदवला गेला. यावरून मात्र पुणे पोलिसांसह राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
-महत्वाच्या बातम्या-
-बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामला पुण्यात का आणलं?
-संयुक्त दहीहंडीला पुणेकरांची पसंती, पूनीत बालन ग्रुपच्या दहीहंडीचा थरार
-युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेने पाळायचा का? मुळीकांनी आमदार टिंगरेंना सुनावलं
-वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळे एकवटली, ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ३५ मंडळांची एकत्र दहीहंडी