पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून एकीकडे कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा उच्छाद तर दुसरीकडे स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराची घटना या दोन्ही घटनांसह शहरात अनेक छोटे-मोठे गुन्हे घडत आहेत. गुंड गजा मारणेच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणाला मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच २ दिवसांत गजा मारणेला देखील ताब्यात घेतले होते. आता गजा मारणेला कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
गुंड गजा मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजता गजा मारणेला त्याच्या टोळीसह न्यायालयात हजर करण्यात आले. १९ फेब्रुवारी रोजी मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्ती तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. आज त्याची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. गजा मारणेने गुन्हा घडला त्या दिवशी वापरलेली फॉर्च्यूनर कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.
मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांनी फिर्यादीनुसार, पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर या चौघांना अटक केली आहे. गजा मारणेचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार, रुपेश मारणे हे दोघे अद्याप फरार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’
-स्वारगेट अत्याचार: तपासात दररोज नवे खुलासे; पुणे पोलिसांचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता कधी जमा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची महिती
-लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा अन् मग… पोलिसांनी नराधम दत्ता गाडेची कुंडली काढली
-काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं