पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची निवड करण्यात आली आहे. ओमप्रकाश दिवटे यांची पुणे पालिकेने अतिरिक्त आयुक्त या रिक्त पदावर नियुक्ती केली आहे. ओमप्रकाश दिवटे यांची प्रतिनियुक्ती ही प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून २ वर्षाच्या कालावधीसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
काय अटी आहेत?
(अ) जर त्यांची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने शासनास आवश्यक वाटली तर, प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत बोलावून घेण्याचा अधिकार शासन राखून ठेवत आहे.
(ब) जर त्यांची सेवा स्वीयेतर नियोक्त्याला आवश्यक वाटली नाही तर, त्यांच्या सेवा परत करण्याची मुभा स्वीयेतर नियोक्त्याला राहील.
(क) त्यांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उद्देश आहे, अशी कमीत कमी ३ महिन्यांची लेखी नोटीस शासनाला दिल्यानंतर त्यांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.
३. ओमप्रकाश दिवटे यांनी प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होवून, तसा अनुपालन अहवाल शासनास सादर कारावा.
सदर प्रतिनियुक्ती ही महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र
-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी