पुणे : देशातील सर्वात मोठा जीएसटी घोटाळ्याचे पुणे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या पुणे क्षेत्र युनिटने 1,196 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला आहे. यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुणे, दिल्ली, नोएडा, मुजफ्फरनगर या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट व्यवहार दाखविणाऱ्या अनेक बोगस कंपन्या उघडकीस आल्या असल्याचे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या ई-वे बिलांवर RFID चा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मालाचा प्रत्यक्ष पुरवठा झाला नसल्याचे सिद्ध झाले. या बनावट टोळीने 1,196 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी मिळवले आणि दुसऱ्याना देखील दिले.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जीएसटी नोंदणीच्या कायदेशीर परिणामांची माहिती नसलेल्या आणि संशय येणार नाही अशा कर्मचाऱ्यांच्या जे प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील होते. त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करुन आयटीसी घोटाळा सुलभ करण्यासाठी या बनावट कंपन्या आपापसात पुरवठादार आणि प्राप्तकर्ता म्हणून काम करत होत्या. कोणालाही संशय येऊ नये म्हणून या कंपन्यांची नोंदणी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या म्हणून करण्यात आली होती. कर दायित्व पार पाडण्यासाठी बनावट पुरवठ्यांमधील आयटीसीचा वापर केला जायचा आणि लाभार्थ्यांना आयटीसी हस्तांतरित केला जात होता.
त्यांच्या ग्रुपने पत्ते, ओळखपत्रे, ईमेल आयडी आणि फोन नंबरचा डेटाबेस ठेवला होता. नव्याने स्थापन कंपन्यांवर याच ग्रुपमधून संचालक किंवा मालक निवडले गेले होते, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना बेकायदेशीर व्यवहार चालू ठेवता आले. व्यापाराचे अस्सल चित्र उभे करण्यासाठी आरोपींनी कोणतेही कायदेशीर व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. तपासात आतापर्यंत अशा 20 बनावट कंपन्या आढळल्या आहेत. ज्यांचा कोणताही खरा व्यवसाय नाही. अधिकाऱ्यांनी बनावट कंपन्यांशी संलग्न एक बँक खाते देखील गोठवले असून पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला’ दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमावरुन पुण्यात वादंग, नेमका काय प्रकार?
-पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?
-मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’
-Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…
-‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?