पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या माध्यमातून रणनीती आखली जात आहे. हा मतदारसंघ मिळवण्यासाठी देखील बागुल आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर सक्षम चेहऱ्यांना पक्षांमध्ये काम करण्याची संधी देण्याचे धोरण काँग्रेसकडून अवलंबले जात असून, मार्केटयार्ड काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विश्वास दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तसेच पुणे शहर कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांच्या प्रयत्नातून पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्वती मतदारसंघ मार्केट यार्ड ब्लॉकच्या अध्यक्षपदी विश्वास दिघे यांची निवड झाली आहे.
याबाबत विश्वास दिघे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच ‘मला पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्वती मतदारसंघ मार्केट यार्ड ब्लॉकच्या अध्यक्षपदी निवड करून माझ्यावरती जो काँग्रेस पक्षाने व आमच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र ठरून मी येणाऱ्या काळामध्ये मार्केट यार्ड ब्लॉक मध्ये काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार’ असे विश्वास दिघे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन