पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन प्रस्तावित भुयारी मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेस गती देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार हेमंत रासने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, अवर सचिव प्रज्ञा वाळके, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघ हा पुण्याचे हृदयस्थळ असून, इथली वाहतूक सुरळीत होणे आवश्यक आहे. मात्र, दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नाही. त्यामुळे आम्ही भुयारी मार्ग प्रस्तावित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पाच्या डीपीआरला हिरवा कंदील दिला. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.”
कसबा मतदारसंघात भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी यशस्वी पाऊल..!
पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या आपल्या कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भुयारी मार्ग प्रकल्प निर्मितीसाठी आपल्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम… pic.twitter.com/zUxn5b35HF
— Hemant Rasane (@HemantNRasane) March 20, 2025
वाहतूक कोंडीसाठी भुयारी मार्ग हा सर्वोत्तम पर्याय
कसबा मतदारसंघ हा पुण्याच्या मध्यवर्ती भागात येतो. या ठिकाणी शनिवारवाडा, लाल महाल, कसबा गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई यांसारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वास्तू आहेत. दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक या भागात येत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. या भुयारी मार्गांच्या निर्मितीमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल, तसेच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल.
महत्वाच्या बातम्या-
-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?
-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…
-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर