पुणे : हनुमान जयंतीच्या दिवशी १२ एप्रिल रविवावरी रात्री ८ च्या सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी बाजूला असणाऱ्या अजान रोखण्यासाठी शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील घुसून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे.
ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेला आहे. यावेळी अजान रोखण्यासाठी या सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत घुसून गोंधळ केला. यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली, असाही आरोप राहुल डंबाळे यांनी केला आहे.
वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही. या सर्व गोंधळापुर्वी त्यांनी ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी वक्तव्ये त्यांच्या भाषणातून केली असल्याचं देखील राहुल डंबाळे म्हणाले आहेत. दर्गा ट्रस्ट कडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा आणि परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकूचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारो वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार आहे. हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालणा देणारा असून यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी, अशी मागणी राहुल डंबाळे यांनी सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस
-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल
-पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?
-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश