पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि अनेक विविध विकासकामांचं लोकार्पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘विरोधकांच्या काम करण्याच्या गतीमुळे महाराष्ट्रासह भारताचे नुकसान झाले’ असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोईसुविधा वाढव्या, या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. पुण्याचा मोठ्या गतीने विकास होतो आहे. महायुती याच अनुषंगाने मोठे काम करत आहेत, आता सुरू असलेला विकास खूप आधी येणं अपेक्षित होतं. मात्र आधी प्लॅनिंग आणि विकासाला विलंब झाला, जर अशा कोणती योजना बनली तर ती फाईल वर्षोंवर्षे तशीच धुळखात पडत होती, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.
मेट्रोची चर्चा ही २००२ मध्ये झाली होती. मात्र, आमचं सरकार आल्यानंतर याला चालना मिळाली. आज एका जुन्या कामाचा लोकार्पण केलं, तर आजच एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभं करू शकली नव्हती, मात्र, आमच्या सरकारने तुमच्या सेवेत मेट्रो आणली, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं काय सुरुय? भारती विद्यापीठ परिसरात ५६ लाखांची अफू जप्त
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त टळणार? राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकण्याला कार्यकर्त्यांचा विरोध
-मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी घेणार मोठा निर्णय
-‘राजगडला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त’; संग्राम थोपटेंचा रोख नेमका कोणाकडे?