पुणे : भाजपचे नेते मंत्री, आमदार नितेश राणे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही. निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा”, असं वक्तव्य मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
“मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?” असा सवाल देखील बॅनर मधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यात राणे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. “सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब” असं लिहून निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?” असा सवाल देखील बॅनरवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही, निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा. पुढील वर्षी महायुतीच्या उमेदवारालाच निधी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजप म्हणून लढविणार आहोत. १० वर्षात विरोधात असताना खूप मला त्रास झाला, आता मी सत्तेत आहे. आपल्या भाजपची ताकद वाढायला हवी. मुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद वाढवा, त्यांचे हात बळकट करा, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणीही चुकून विरोधकांना मदत करू नका. या जिल्ह्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली काम करू, असे नितेश राणे म्हणाले. यावरुन पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Metro News: शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धक्का नाही; महामेट्रोने मार्ग बदलला!
-‘अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच’; आशिष शेलारांची टीका
-जास्तीच्या निधीसाठी भाजपच्या आमदारांची जोरदार फिल्डींग! पालिका आयुक्तांकडून कोणाला झुकतं माप?
-जानेवारी महिन्यात पुणेकरांचा सुखकर प्रवास, पीएमपी अपघातांना ब्रेक; नेमका कसा घडतोय बदल?
-आमदारांना हवाय पालिकेचा कोट्यवधींचा निधी; वार्षिक अंदाजपत्रकात सुरु घुसखोरी!