पुणे : पंतप्रधान नरेंंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेस कोर्स मैदानावर जनतेला संबोधित करणार आहे. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास ‘दिग्विजय पगडी’ महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे. पाहता क्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले आहे, मात्र यंदाची पगडी हा चर्चेचा विषय ठरली आहे.
“ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा ७ घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
“मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी खास पगडी साकारल्यानंतर त्यांचे स्वागतही जोरदार केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करणार” असेही मोहोळ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार
-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित
-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी