पुणे : पुणे शहरात मेट्रोचे जाळे पसरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजीनगर सिव्हील कोर्ट ते स्वागरेटच्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पुण्यात येणार होते. मात्र शहरातील पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणे काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदींच्या दौऱ्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत बोलताना म्हणाले की, ‘मोदींच्या दौऱ्यासाठी नागरिकांच्या करोडो रुपयांचा चुराडा केला जातो. महायुतीतील पक्ष आपले झेंडे कार्यक्रम स्थळी लावतात. हे निवडणुकीची तयारी असल्याचं दिसत आहे. आम्ही या विरोधात आंदोलन केले असते पण पुण्याला मेट्रो मिळते म्हणून शांत बसलो. मात्र आता महाविकास आघाडी सामान्य जनतेला सोबत घेऊन सिव्हील कोर्टे ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन करेल.’
दरम्यान, यावेळी बोलताना आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारला १० प्रश्न विचारुन धारेवर धरलं आहे. यावेळी बोलताना धंगेकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाकडून झालेल्या अपघाताचा देखील उल्लेख केला आहे. तसेच बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी
-ना भाई, ना ताई! कसब्यात काँग्रेसमध्ये वाद पेटला, धंगेकर समर्थकांच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण
-शरद पवार करणार अजितदादांची कोंडी; ‘त्या’ १२ मतदारसंघात लावली जोरदार फिल्डींग
-दौरा मोदींचा, शक्तीप्रदर्शन इच्छुकांचं; शहरभर झळकले बॅनर्स
-वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच