पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असून शहरातील सर परशुराम महाविद्यालयाच्या (एस. पी. कॉलेज) मैदानावर त्यांची सभा होणार आहे. मोदींच्या सभेसाठी शहरातील वाहकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगडरस्त्याकडे जाता येईल. नाथ पै चौकातून वाहनचालकांना सिंहगड रस्त्याकडे जाता येईल. बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जाता येईल. टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जाऊ शकता.
गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जाता येईल. डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
महत्वाच्या बातम्या
-‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेत’; आबा बागुलांचा गंभीर आरोप
-‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद
-स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!