पुणे : सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारे तसेच प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर चैतन्य महाराजांना अटक करण्यात आली आहे. ह. भ. प. चैतन्य महाराजांसह त्यांच्या दोन भावांनाही पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
चैतन्य महाराजांच्या घरापासून जवळ एक कंपनी आहे. या कंपनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद आहेत. याच वादातून त्यानी रात्री त्यांच्या दोन भावांसह रस्ता बेकायदेशीरपणे खोदला. या प्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यानुसार चैतन्य महाराज आणि दोन भावांना अटक करण्यात आली आहे. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचे म्हणत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांविरोधात तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्या नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरी विधानसभा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढणार!
-बालेकिल्ल्यात अजितदादांना आणखी एक मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं साथ सोडताच केली जहरी टीका
-नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?
-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम