पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराने थैमान घातलं असून आता या आजाराने एका ६४ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या आजारानंतर त्या महिलेला न्यूमोनियाची लागण झाली होती. जीबीएस आजार झालेल्या या महिलेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरु होते. महिलेचा मृत्यू हा न्यूमोनियामुळे झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
मृत ६४ वर्षीय महिलेला १७ नोव्हेंबर रोजी गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने २४ नोव्हेंबरला डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये उपचाराचासाठी नेण्यात आले. या रुग्णाला न्यूमोनियाची लागण झाली आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर २९ डिसेंबरला या महिलेला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. महिलेवर उपचार सुरू असताना मंगळवारी (२१ जानेवारी) मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू न्यूमोनिया या आजाराने झाला असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले आहे.
पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे ७३ रुग्ण आहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्ण होते. पिंपरी-चिंचवडमधील १३ रुग्णांपैकी ६ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एका महिलेचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पुणे शहरामध्ये जीबीएस आजाराचे रग्णसंख्या वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…
-शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार
-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!