पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच भारताने देखील करारा जवाब देण्यासाठी महत्वाचे ५ निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटर कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र आता २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतय, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला आहे. “कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो भाडमध्ये गेलं ते रद्द केलाय तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप ऍक्शन घ्या ना. जे समोर आलं त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला १० वर्षे लागतील”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
पाकिस्तानी नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत. आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार.. या उस पार. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी यासाठी 2 मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी
-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?
-ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’
-चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?