पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ६ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या या विकास आराखड्याची प्रक्रिया आता नव्याने राबवावी लागणार आहे. त्याबाबतचा आदेश पीएमआरडीएला देण्यात आला आहे. पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
उपरोक्त विषयास अनुसरून, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य सरकारने पीएमआरडीएचा डीपी रद्द करत पुणे जिल्हा बकाल करण्याचे ठरवले आहे. हा डीपी रद्द झाल्याने पुणे जिल्हा व परिसरातील नागरिकांचा विकासाचा हक्क राज्य सरकारने हिरावला आहे. पीएमआरडीए स्थापन होऊन २२ वर्षे झाली, तरीही पुण्याला डीपी मिळाला नाही. आताचा डीपी तयार करण्यासाठी ७ वर्षे घेतली आणि त्यानंतर तयार झालेला डीपी रद्द केला, ही पुणे जिल्ह्यातील नागरिकांची थट्टा आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
पीएमआरडीए डीपी रद्द का केला? याचा भांडाफोड करणार
“हा आशिया खंडातील सर्वात मोठा डीपी असून, त्याच्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाले आहेत. महायुती सरकारशी संलग्न असलेले दलाल निळावर हे काम करतात. त्यांनी आरक्षण टाकण्यासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपये घेतल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत”, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.
मंत्रालयाजवळील उच्चभ्रू हॉटेलांमध्ये निलावर यांच्या कंपनीच्या माध्यमातून आमदारांसाठी खोली बुकिंग केले जाते. अनेक शेतकरी स्वतः आमच्याकडे येऊन आपली हकिकत सांगत आहेत, पुणे जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे संपर्क साधावा. आपले पैसे परत मिळवून देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आपल्या पाठीशी आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
याच आर्थिक गैरव्यवहारामुळे मुख्यमंत्र्यांनी डीपी रद्द केला. डीपीचे काम हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पार पडले असून, याच काळात लोणीकंद परिसरात केवळ १० लाख रुपयांत आरक्षण देण्यात आले, तर बावधन परिसरात चक्क स्क्वेअर फुटप्रमाणे पैसे घेतले गेले. हे सर्व पैसे पुण्यातच गोळा करण्यात आले होते. याबाबतचे सर्व पुरावे मी शरद पवारांना देणार आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे. शरद पवार स्वतः या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
-सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा