पुणे : पुणे तिथं काय उणे! पुण्यातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये चॉकलेट शेकच्या नावाखील उंदीर शेक दिल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. लोहगावमधील एका प्रसिद्ध कॅफेमधून चॉकलेट शेक ऑर्डर करणं एका विद्यार्थ्याला चांगलंच महागात पडलं आहे. २१ वर्षीय विद्यार्थ्याने चॉकलेट शेक ऑनलाईन ऑर्डर केला पण त्याला चॉकलेट शेक ऐवजी उंदीर शेक मिळला. हा शेक पिऊन तो विद्यार्थी थेट रुग्णालयात भर्ती झाला.
व्हेलेंटाइन डे निमित्ताने दोन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री एका फूड डिलिव्हरी अॅपवरुन लोहगावमधील प्रसिद्ध कॅफेमधून चॉकलेट शेक ऑर्डर केला होता. चॉकलेट शेकमध्ये चक्क मृत उंदीर पाहून दोघांनाही धक्काच बसला. उंदीर शेक पिल्यानंतर या मुलगाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली अन् तपासणी करून घेतली. दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, कॅफे मालकाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. तरुणाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुण्यातील लोहगावमधील दोन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून चॉकलेट शेकची ऑर्डर केली होती. त्यातील एक २१ वर्षीय विद्यार्थी ते शेक प्यायला. सुरुवातीला त्याला काहीच जाणवलं नाही. मात्र, शेक प्यायल्यानंतर ग्लासाच्या तळाला मेलेला उंदीर दिसला. यानंतर त्याने रुग्णालयात जात तपासणी करून घेतली. दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, कॅफे मालकाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उंदराची तपासणी करण्यात आली असता त्याच्या अंगावर कापल्याच्या खुणा आहेत. उंदीर चुकून मिक्सरमध्ये पडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅफेमधील कर्मचाऱ्याचं लक्ष नसल्यामुळे हे शेक तसंच पार्सल करण्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी पोलीस या प्रकरणात कॅफे मालकाची चौकशी करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?
-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?
-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती
-अजितदादांच्या ‘गुगली’ने मनसे नेत्याची दांडी! थेट म्हणाले “तुझ्या नेत्याला सांग..”