पुणे : पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी आणि पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालक बांधवांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिमाले यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम रविवारी (१ सप्टेंबर) संध्याकाळी ५:३० वाजता मुकुंद नगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर होणार आहे.
रिक्षाचालक बांधवांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मदतीचा हात देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ज्या रिक्षा चालकांनी नोंदणी करत रिक्षावर स्टीकर लावले आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.
View this post on Instagram
श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघामध्ये लाडकी बहिण सन्मान हा कार्यक्रम देखील घेतला होता. या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. भव्य महिला मेळावा आणि लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा कार्यक्रमाला हजारो महिला उपस्थितीत होत्या. त्यानंतर आता रिक्षा चालकांसाठी गणवेश वाटपाचा देखील कार्यक्रम भिमालेंनी आयोजित केला आहे. या उपक्रमात पर्वती विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी ९९२१९०९२५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीनाथ भिमाले यांच्याकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सकाळी लवकर उठता मग, आमच्यावर उपकार करता का? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजितदादांना सुनावलं
-राज्य सरकारने दिलेला ‘तो’ निधी फक्त भाजप आमदारांनाच; निधीतला काँग्रेस, राष्ट्रवादीला रुपयाही नाही
-पुण्यात होणार सर्वात मोठे रुद्रपूजन; पुणेकरांनी सपत्नीक सहभागी होण्याचे चंद्रकांत पाटलांचे आवाहन
-विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी