पुणे : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. पुणे जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार होते. तर २ एप्रिल रोजी एकूण मतदारांची संख्या ८९ लाख ९९ हजार १९० इतके मतदार होते. यावेळी सुमारे ५ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे दीड लाख मतदार वाढले आहेत. सर्वाधिक वाढ हडपसर मतदारसंघात असून येथे ७ हजार ९१० पुरुष, तर ९ हजार १५९ महिला मतदार वाढले आहेत. सर्वात कमी ५०८ पुरुष व ७१९ महिला मतदार शिवाजीनगर मतदारसंघात वाढले आहेत.
पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार होते आता या मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे. विधानसभेला एकूण मतदारांमध्ये ४५ लाख १९ हजार २१६ पुरुष, तर ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला तर ८०५ तृतीयपंथी मतदार होते. या मतदारसंख्येत आता तब्बल दीड लाखांनी वाढ झाली आहे.
एका वर्षात चार वेळा मतदारांसाठी अहर्ता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यापूर्वी नवमतदारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.
विधानसभा मतदारसंघात किती मतदार वाढले?
जुन्नर – ३,९६४
आंबेगाव- ३,९९६
खेड, आळंदी – ६,६३६
शिरुर – ९,२७४
दौंड – ३,२२९
इंदापूर – ३,३०२
बारामती – ३,८९३
पुरंदर – १८,९९४
भोर – १२,०९२
मावळ – ४,१३९
चिंचवड – ११,२९२
पिंपरी – ७,१५०
भोसरी – ११,६६९
वडगाव शेरी – १०,७४८
शिवाजीनगर – १,२२९
कोथरुड – २,९२७
खडकवासला – ७,३०३
पर्वती – ३,८४८
हडपसर – १७,०७३
पुणे कॅन्टोन्मेट- ४,७२०
कसबा – १,७३०
असे एकूण १ लाख ४९ हजार ६०० नव्या मतदारांची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘रुग्णालयाकडून ४८ तासात कर वसूल करा नाही तर मी..’; सुप्रिया सुळेंचा इशारा
-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा
-‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य