पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नेहमीच गर्दी होत असते. १ फेब्रुवारी उद्या श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. शनिवार सकाळी ७ नंतर श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच गर्दी वाढली तर लक्ष्मी रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, तसेच अन्य वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक, टिळक चौकमार्गे स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चैाकमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. या मार्गावरही गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा
-खाकी वर्दीला कलंक: हुक्का पार्लर चालकाकडून ‘तो’ पोलीस उपनिरीक्षक घेत होता २० हजारांचा हफ्ता
-‘भाजपने पुणेकरांची फसवणूक केली’; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप