पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘इंडियाज गाॅट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरु आहे. या शोमध्ये रणवील अलहाबादिया, समय रैना आणि अपूर्वा मख्खीजा यांनी अतिशय खालच्या पातळीवर वल्गर शब्दांमध्ये भाष्य केले आहेत. त्यामुळे या तिघांविरोधात मुंबईसह देशभरातील वेगवेगळ्या शहरामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांना आता आसाम पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महिला आयोगाने देखील अलाहाबादिया, रैना यांच्यासह ३० जणांना समन्स बजावले आहे.
आसाममध्ये अलबादिया आणि रैना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आसाम पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले. समय रैना बालेवाडीतील एका सोसायटीमध्ये राहायला आहे. बालेवाडीतील निवासस्थानी जाऊन आसाम पोलिसांनी समन्स बजावले, असे ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘व्हॅलेंटाईन डे’ला चढली झिंग, पुण्यात महिलेचा दारु पिऊन तमाशा; भर रस्त्यात बसली अन्…
-“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब”; पुण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी
-Metro News: शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धक्का नाही; महामेट्रोने मार्ग बदलला!
-‘अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच’; आशिष शेलारांची टीका
-जास्तीच्या निधीसाठी भाजपच्या आमदारांची जोरदार फिल्डींग! पालिका आयुक्तांकडून कोणाला झुकतं माप?