पुणे : पुणे जिल्हात घरांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५७० घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के वाढ झाली असून याची नोंद करण्यात आली आहे. या घर खरेदीच्या व्यवहारातून सरकराला ६२० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) मिळाले आहे. यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे. नाइट फ्रँक इंडियाने केलेल्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५७० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात घरांची विक्री १४ हजार २८४ होती.
“पुण्यात परडवणारी घरे उपलब्ध असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. चालू वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. या वर्षात घरांना चांगली मागणी दिसून येणार आहे”, असे नाइट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल हे म्हणाले आहेत.
‘घरांच्या विक्रीत ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ४० टक्के आहे. त्या खालोखाल ५०० चौरस फुटांपेक्षा लहान घरांच्या विक्रीचे प्रमाण ३५ टक्के आहे. याचवेळी १ हजारहून अधिक चौरस फुटांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १३ टक्के असून सर्वाधिक पसंती ही मध्यम आकाराच्या घरांना दिसून आली आहे,’ असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
गतवर्षच्या तुलनेत यंदा २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. २०२३मध्ये याच महिन्याच्या तुलनेत त्यात २० टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये घरांच्या विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण विक्रीत त्यांचे प्रमाण ३२ टक्के आहे. त्याखालोखाल २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे. याचवेळी २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीतही वाढ होऊन त्यांचे प्रमाण २२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश
-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक
-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर
-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी