पुणे : वाहनचालकांसाठी आता अत्यंत महत्वाची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आता अधिक सोपं झालं आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग प्रशिक्षणासंबंधी नवे नियम तयार केले आहेत. नव्या नियमानुसार जिथे वाहन चालवणे शिकलात, तिथेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची देखील गरज नाही. तसेच वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) देखील विनाविलंब मिळत असल्याने नागरिकांची सोय झाली आहे.
या आधी अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून कार चालवण्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ठराविक एजंटांमार्फत ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागायचे मात्र आता नियमात बदल केल्यामुळे जिथे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले तिथेच ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यलयात जाण्याचे टेन्शन राहणार नाही.
असून या नियमांची अंमलबजावणी १ जून २०२४ पासून केली जात आहे. या अंतर्गत ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे नियम अधिक कडक झाले आहेत. जिथे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले, तिथेच टेस्ट देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत. यापुढे कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमधून वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर तेथूनच प्रमाणपत्र देण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-नागरिकांच्या दारात बँड वाजवला, करबुडव्यांच्या मिळकती जप्त, पालिकेची १८ दिवसांत ४० कोटींची वसुली
-मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी
-पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी
-ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’