पुणे : सध्या राज्यभर यात्रांचे वातावरण आहे. अशातच पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला गावच्या यात्रेमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. भूम तालुक्यातील आंदरुड गावामधील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी निलेश घायवळ आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्याचवेळी त्यानेच भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत त्याला एका पैलवानाने जोरात कानशिलात लगावली. त्याला मारहाणही केली असल्याचे समोर आले आहे. निल्या घायवळला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पैलवानाने निलेश घायवळच्या थोबाडीत लगावली. मात्र आजूबाजूचे लोक लगेच त्याच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला. हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचे समजते. घायवळच्या कानशीलात लगावल्यानंतर मारहाण केलेल्या पैलावानाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. पैलवानाने नेमकं का मारलं? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत काय आहे?
निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक कुस्तीच्या फडात पैलवानांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी चालले होते. त्यावेळी समोरच उभा असलेला पैलवान निलेश घायवळच्या अंगावर धावून गेला आणि त्याने घायवळच्या कानाशिलात मारली. त्यानंतर घायवळ गँग या पैलवानावर तुटून पडले. त्यांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
-हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार, पुण्यात नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांसाठी खुशखबर! यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीची चिंता मिटली
-‘मी फक्त सरकामधील घटक पक्षाचा आमदार, त्यामुळे…’; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा ‘ती’ सल बोलून दाखवली
-दीनानाथ रुग्णालय प्रकरणात भाजप आमदाराचा यूटर्न; जयंत पाटलांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
-पालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली, पडद्यामागं नेमकं काय घडतंय?