पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवतीर्थ मंगल कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरण अनावरण समारंभ तसेच शेतकरी मेळाव्याच्या आयोजन कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थित आहेत. यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफी बाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे आता शेतकरी मेळाव्यात अजित पवार काय बोलणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
नुकत्याच सादर केलेला अर्थसंकल्प तयार करत असताना राज्याला आणि राज्याच्या कारभाराला शिस्त लावायची होती. आपलं राज्य हे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचं राज्य आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना शेतकरी, उद्योग, आरोग्य, उद्योगातून रोजगार आणि शिक्षण या सर्व बाबींना अधिक महत्व देण्याचा प्रयत्न केला, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘काही जण म्हणत होते मागच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. ३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनी पिककर्जाचे पैसे भरा. जे काही सांगितलं आहे ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण ७ लाख २० कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास ६५ कोटी रुपये वीज माफी करुन सरकार महावितरणला भरत आहेत. लाडक्या बहिणींप्रमाणे त्यांना ४५ हजार कोटींची तरतूद करावी लागली आहे. साडे तीन लाख कोटी रुपये अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, स्टाफचे पगार, निवृत्तांची पेन्शन, घेतलेल्या कर्जाचे व्याज तसेच शिक्षणासाठीचा खर्च, रस्ते, लाईट, पाणी मूलभूत गरजांसाठी लागणारा खर्च असे अनेक खर्च असतात. पुढच्या वर्षी देखील पीक कर्जाचे पैसे भरा’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखाना हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असला तरीही आता शदर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे स्वत: युगेन्द्र पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचालींना कमालीचा वेग आल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता
-वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ
-Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर