पुणे : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यात हालचालींना वेग आला आहे. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातही पुण्यात अधिकाधिक मतदारसंघ मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोर लावताना दिसत आहेत.
महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सेना नेते प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेना (UBT) पक्षाचे नेते नितीन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. वडगाव शेरी मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी विनंती त्यांनी या भेटीत केली आहे.
याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, ‘पुणे शहरामध्ये शिवसेनेने चार जागांची मागणी केली असून शिवसेनेला सन्मानपूर्वक कमीत कमी दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. यातही वडगाव शेरीमध्ये सेनेची ताकत असून तीन नगरसेवक व पाच माजी नगरसेवक आहेत. 2009 च्या इलेक्शनला शिवसेनेला 38 हजार मतदान मिळाले होते. तसेच 2014 साली शिवसेनेने इलेक्शन लढवून वडगाव शेरी मतदारसंघात दोन नंबरची 62000 मते घेतली होती. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मागील निवडणुकीत आठही मतदारसंघात भाजपने आठ उमेदवारांना तिकीट देऊन शिवसेनेची कोंडी केली होती. त्याचा फटका भाजपला हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात बसला. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचा व हडपसरमध्ये राष्ट्रीवादीचे आमदार निवडून आले. हा इतिहास पाहता यंदा शिवसेनेला पुणे शहर व जिल्ह्यामध्ये सन्मानपूर्वक जागा देऊन शिवसेनेने लोकसभेला शिरूर आणि बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्याची परतफेड विधानसभेत करावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली आहे.’
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघासाठी उबाठा पक्षाकडे सुषमा अंधारे, नितीन भुजबळ आणि संजय भोसले असे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे पक्षाने या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. आता नितीन भुजबळ यांच्या शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर वडगाव शेरी मतदारसंघाबाबत काय निर्णय येतो? हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?