पुणे : पुणे विमानतळावर नागरिकांसाठी अनेक नवीन सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. अशातच नवीन टर्मिनलमध्ये ‘डिजियात्रा’ सुविधेचा प्रारंभ शनिवारी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाध साधला असता राज्यातील ३३ विमानतळांवर मुलभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मात्र, या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर नुकतीच बैठक पार पडली असून, टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागतील, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
“महाराष्ट्रातील ३३ विमानतळ असे आहेत, ज्या विमानतळांवर मुलभूत सुविधा अद्याप नाहीत. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत नागरी हवाई सुविधा वाढविण्यात येत असल्याने विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे रखडली आहेत. विस्तारीकरणासाठी भूसंपादन होणे आवश्यक असून, अनेक विमानतळांवर विमानांची वाहतूक होत नसल्याचे समोर आले आहे. विमाने उतरविण्यासाठी जागा, सुरक्षा आदी सुविधांची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. त्यावर तातडीने मार्ग काढण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.”
आज माननीय केंद्रीय नागर विमानन एवं सहकारिता राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोल जी @mohol_murlidhar द्वारा भाविप्रा के पुणे हवाई अड्डे @aaipunairport पर डिजी यात्रा सुविधा का उद्घाटन किया गया। डिजी यात्रा फेस रिकग्निशन तकनीक पर आधारित है, जिससे यात्री बिना फिजिकल डॉक्यूमेंट दिखाए… pic.twitter.com/b96IFj3sRn
— Airports Authority of India (@AAI_Official) February 8, 2025
“लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली असून, पुढील ५० वर्षांच्या दृष्टिकोनातून विस्तार करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची, संरक्षण विभागाची आणि खासगी जागा किती आहे, याबाबतचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार २०० ते २५० एकर जागा अपेक्षित आहे. हा भूसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. लवकरच प्रादेशिक, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यात येतील”, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: महापालिका निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती
-“दादा बोलले असतील तर फायनल…”, पालिका निवडणुकीबाबत सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य
-Delhi Vidhansabha: “…तर भाजपच्या २० जागा आल्या नसत्या”, शरद पवारांच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
-आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…
-पुण्याच्या गुन्हेगारीला बसणार चाप; पुणे पोलिसांनी आखली ‘ही’ मोठी योजना