पुणे : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. पुण्याचं पालकमंत्रिपद हे अजित पवारांना मिळणार की चंद्रकांत पाटील यांना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. अशातच यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावरती आपली गुगली टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
पालकमंत्रिपदी कोणते दादा यावेत असं वाटतं? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘तुम्ही कशीही गुगली टाकली तरी मी सावध आहे. यॉर्कर टाका, गुगली टाका मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललो आहे. खातेवाटप एकमताने झाले आहे, आता ज्या -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना एकमताने होतील. याबाबत कोणतीही शंका माझ्या मनात नाही, तुम्हीसुद्धा ठेवू नका.’
‘आमच्याकडे या स्तरावरती काही ठरत नाही. आमचे नेते त्याच्यावर निर्णय घेत असतात, पालकमंत्रिबाबत महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय घेतील. फक्त पुण्याचे नाही तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचे निर्णय होतील’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना नाव बदलासाठी धमकीचे फोन
-महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत लढावंच लागेल पण…’
-पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत पुण्यानं पटकावलं पाचवा क्रमांक; कशात केली सर्वाधिक गुंतवणूक?