पुणे : पुणे शहरातील बेकायदा गाळ्यांवर महानगर पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. औंधमधील परिहार चौकाजवळ बेकायदा ३० गाळे कसे उभे राहिले, याची चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची समिती नेमली आहे.
औंधमधील फूटपाथवर महापालिकेने २००२मध्ये शिवदत्त मित्र मंडळाला भाजी मंडईसाठी जागा दिली होती. त्याबाबतचा करार २०१३ मध्ये संपला. मात्र हा करार संपल्यानंतर आता प्रत्यक्षात या ठिकाणी बांधकाम करुन ३० टपऱ्या उभारल्या गेल्या आहेत. याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने या भागातील माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती मधुकर मुसळे यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते.
मुसळे यांनी आंदोलन केल्यानंतर या प्रकाराची दखल घेत आयुक्त डॉ. भोसले यांनी तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावरुन हे सर्व गाळे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आयुक्तांनी ते पाडून टाकण्याचा आदेश दिला. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई करत हे गाळे पाडून पदपथ रिकामा केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमचा पदर-बिदर सगळं फाटून गेलंय’; अजित पवार असे का म्हणाले?
-संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
-पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना केली ‘ही’ विनंती