पुणे : राज्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौंटुबिक वादाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. धनंजय मुंडे यांना या प्रकरणी करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याते आदेश वांद्रे सत्र न्यायालयाने दिले होते. मात्र, या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तसेच ‘२ लाख ही खूप कमी रक्कम असून ९ लाखांची पोटगी देण्यात यावी’, अशी मागणी करुणा शर्मा मुंडे यांनी केली होती. याबाबत शनिवारी माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली.या सुनावणीमध्ये मुंडेंच्या वकिलांने ‘धनंजय मुंडे यांनी मुलांचा स्विकार केला आहे. मात्र त्याच मुलांची आई करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला नाही’, असा दावा केला. यावरुन आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक सेविका तृप्ती देसाई या धनंजय मुंडेंवर चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.
“करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. मात्र, आता धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे की, मुलं माझी आहेत. पण करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीत. धनंजय मुंडे नाकारत असले तरी करुणा मुंडे याच त्यांच्या पहिल्या पत्नी असून ती मुलं देखील त्यांचीच आहे. धनंजय मुंडे हे मुलांचा स्विकार करत आहेत. मात्र, त्या मुलांना जिने जन्म दिला त्या आईला स्विकारत नाही. जिने तुम्हाला अनेक वर्ष साथ दिली. त्या महिलेला मात्र धनंजय मुंडे रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे म्हणत आरोप तृप्ती देसाईंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांचा पूर्वीच पापाचा खडा भरला असून आता तरी त्यांनी अशाप्रकारे फसवणूक करू नये. स्वतःची आमदारकी जाण्याची धनंजय मुंडे यांना भीती वाटत असल्याने मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं ते खोटं जनतेला सांगत आहेत. करुणा मुंडे यांचा स्विकार धनंजय मुंडे यांनी पहिली पत्नी म्हणून मोठ्या मनाने करणे आवश्यक आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आमदार झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेमंत रासनेंची प्रभावी कामगिरी
-आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी मित्रालाच आणलं घरी अन्…. पुण्यातील धक्कादायक प्रकार
-मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?; उदयनराजे आक्रमक
-‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
-‘बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’- अजित पवार