पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीची राज्यभर चर्चा सुरु असून यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे बीडचा गुन्हेगाराशी संबंध जोडला जात असल्याने बीडचे नागरिक रोष व्यक्त करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बीडच्या गुन्हेगारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
“बीड प्रकरणात उशिरा का होईना सरकारने अखेर न्यायालयीन समिती नेमली व समितीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नेमणूक केल्याबद्दल सरकारचे आभार. बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न हा राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन आणि गुंड अशा तीन स्तंभांवर आधारलेला असून अत्यंत घातक आहे. या पॅटर्नमध्ये लोकांना धमकावून किंवा प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून कराडची टोळी हवे ते मग ते काहीही असो, असे सर्व प्राप्त करून घेते. सहा-सात महिन्यांपूर्वी याच पद्धतीने कराड टोळीने बबन गीतेंना सुद्धा अडकवले होते. तपास केला तर अशा असंख्य घटना समोर येतील”, असे रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
बीड प्रकरणात उशिरा का होईना सरकारने अखेर न्यायालयीन समिती नेमली व समितीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नेमणुक केल्याबद्दल सरकारचे आभार.
बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न हा राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन आणि गुंड अशा तीन स्तंभांवर आधारलेला असून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2025
“न्यायालयीन समिती खोलात जाऊन पारदर्शक तपास करून गुंडगिरीचा हा पॅटर्न मोडून काढेल, ही अपेक्षा आणि संघर्षाची कष्टकऱ्यांची भूमी असलेला तसेच मोठा वैचारिक वारसा लाभलेला बीड जिल्हा गुंडगिरीच्या ग्रहणातून मुक्त होईल, हा विश्वास आहे”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश
-‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक
-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा; माजी उपसरपंचाची गाडी केली जप्त
-आधी डिलिव्हरी बॉय बनून केली रेकी अन् नंतर…; पुणे पोलिसांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई
-ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…