पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ‘मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं हे काही फार कठीण नाही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिले आहेत. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले आहेत. ‘आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवून यायला तयार आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील हात पुढे केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे’, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या #महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर #सर्वच कुटुंबांनी #महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे.@OfficeofUT… pic.twitter.com/yhohAehobQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 19, 2025
“महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही. हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’