पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये रुग्णसेवा हा त्यांचा धर्म नसून केवळ पैशाचा हव्यास पहायला मिळाला आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएची पत्नी तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत असताना देखील रुग्णालायात दाखल करुन घेतलं नाही. १०-२० लाख रुपयांची पैशांची मागणी करण्यात आली. हातात एवढी रक्कम नसल्यामुळे अखेर तिचा पती सुशांतने तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले मात्र, २ चिमुकल्या मुलींना जन्म देऊन मोनालीने अखेरचा श्वास घेतला. आता रुग्णालयाने आणखी एक प्रताप केल्याचे समोर आले आहे.
रुग्णालायात घडलेल्या प्रकारमुळे मृत महिलेचा पती आणि नातेवाईकांनी रुग्णालायावर आरोप केल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या. रुग्णालयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत विविध राजकीय पक्षांकडून तसेच विविध सामाजिक संघटनांकडून आंदोनल करण्यात आले. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आक्रमक आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाच्या पाटीला काळं फासलं, पैशाचा हव्यास असणाऱ्या रुग्णालयाला चिल्लर फेकत आंदोलन केले. रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत समिती स्थापन करुन अहवाल तयार केला आहे.
तनिषा सुशांत भिसे या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. याच तनुषा भिजे यांच्यावर २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांमध्ये ५०% टक्के चारिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ साली त्यांना सुखरूप गर्भारोपण आणि प्रसुती होणार नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही. त्याची या रुग्णालयात माहिती नाही. १५ मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफ चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नेंसी बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीसाठी बोलावले त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेला येणे अपेक्षित होतं, मात्र तेव्हाही त्या आल्या नाहीत.
रुग्णालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीमधून रुग्णालयातील इतर सीनियर गायनॅकॉलॉजिस्ट यांच्या मतानुसार या समितीने महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.
- सदर रुग्णासाठी जुळ्या बाळांची गर्भधारणा धोकादायक होती.
- माहितीचे रुग्णालय असून सुद्धा पहिले सहा महिने ए एन सी चेकअपसाठी रुग्णालयात आल्या नाहीत.
- ॲडव्हान्स मागितल्यावर रागातून सदर सदर तक्रार केलेली दिसते रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत. तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला देखील त्यांना दिला होता, पण त्यांनी पाळला नाही.
- रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने रुग्णावर तसेच नातेवाईकांवर महिलेच्या मृत्यूची जाबाबदारी ढकल्याचे पहायला मिळत आहे. रुग्णालयाने अंतर्गत समिती स्थानप करुन स्वत:लाच क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता आणखीच संतापाची लाट उसळत असल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता राज्य सरकारकडून काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार
-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत