पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर टेम्पो जळून खाक झाला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १२ कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. हिंजवडी फेज-१ मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यामुळे चालक आणि पुढच्या भागात बसलेले कर्मचारी ताबडतोब खाली उतरले मात्र, मागचे दार उघडले गेले नसल्याने ४ कर्मचारी गाडीतच अडकले. आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आगीच्या दुर्घटनेमध्ये सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण (वय ४०) अशी मृत्यू झालेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी, जनार्दन हंबारिडकर- टेम्पो चालक अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा-
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?