पुणे : काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे बोलले जात आहे. निष्पाप भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकला करारा जवाब देण्यासाठी भारतीय सैन्य दलासह केंद्र सरकारने देखील कडक कार्यवाहीला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात असलेले पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.
तसेच पाकिस्तानी नागरिकांची यादी राज्य सरकारला प्राप्त झाली पाकिस्तान्यांना असून ४८ तासांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विहित मर्यादेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आढळून आल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आदेशावरुन महाराष्ट्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांबाबत रणनिती आखली आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पाकिस्तानी नागरिकांशी संबंधित संपूर्ण माहिती पाठवण्यात आळी आहे. ‘कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात राहू नये याची काळजी घेत आहे’, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पुण्यात देखील १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर ३ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला. तरीही पुण्यात अद्याप १११ पाकिस्तानी नागरिक आहेत.
महत्वाच्या बातम्या
-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?
-ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’
-चांगल्या रस्त्यांची लागणार वाट! खोदकामामुळे शहरात ५० ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता, नेमकं कारण काय?
-शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणतात, ‘अजितदादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची…’