पुणे : राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे आज निधन झाले आहे. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेतील निवृत्त संगीत शिक्षिका मधुवंती मधुकर पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोथरूड मधील जुन्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मधुकर पाटणकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप
-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; १० ते १२ गाड्यांची तोडफोड
-सासवडमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल