पुणे : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन २० दिवस झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला सुरवात देखील झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्यात आहे. यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा झाल्यानंतर उमेदवार प्रचाराला सुरवात केली आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. “महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या जागावाटपात अपेक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. स्थानिक राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन तिकीट देण्याबाबत पक्षप्रमुखांकडून निर्णय घेतला जातो. पक्षांतर्गत निर्णयावर मी भाष्य करणे योग्य नाही”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
“आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरूप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आमच्यात मनभेद झाले आहेत असे नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलेला नाही”, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
-बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवस उष्णतेत वाढीची शक्यता; रात्री उकाड्यातही वाढ!
-भोसरीत आढळराव पाटलांची ताकद वाढली! विलास लांडे लागले प्रचाराला; नेमकं गणित जुळलं कसं?