पुणे : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली. तसेच या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे. आज पुण्यात सकल मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचे कुटुंब उपस्थित होते. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील आमदार, खासदारांना टोला लगावला आहे.
‘पुण्यातल्या आमदारांना रविवारची सुट्टी असते म्हणून त्यांना इथे यायला सवड मिळाली नसेल. म्हणून ते आले नसतील त्यामुळे त्यांचे आभार’, असा सणसणीत टोला धस यांनी लगावला आहे. पुण्यातील या मोर्चाला बीडचे खासदार बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत, मात्र, या मोर्चासाठी गैरहजर असणाऱ्या पुण्यातील आमदार, खासदार आमदार धस यांनी टोला लगावला आहे.
आणखी काय म्हणाले सुरेश धस?
“पुणे भूमी ही पावन भूमी आहे, पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी इथेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक अगदी अलीकडे म्हणलं तर पु.ल. देशपांडे, महर्षी कर्वे, या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मुलांना संस्कार देताय दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःचे तोंमडी भरण्यासाठी हे कोणाचंही मुंडक कापायला अजिबात मागे पुढे पाहायला ना पहा अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेले आहे.”
महत्वाच्या बातम्या-
-‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा
-पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा
-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले
-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती