पुणे : राज्य सरकारकडून राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’च्या माध्यमातून प्रतिमहिना १५०० रुपये दिले जात आहेत. तसेच राज्यात अनेक कुटुंबांना मोफत धान्य सुविधा दिली जात आहे. अशातच आता रेशन दुकानावर अन्नधान्य याच्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योजन रेशन कार्डधारक लाडक्या बहिणींना या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील रेशन दुकानावर अन्नधान्यासोबत आता साडीही मिळणार असून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ४८ हजार ८७४ महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या ७ हजार ९७५ साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. तर सर्वाधिक कमी अंत्योदय कार्डधारक हवेली तालुक्यात आहेत. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वाटप होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणांचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवजन्मोत्सव: सरदारांकडून शिवरायांना वंदन; शिवजयंतीच्या जल्लोषाने दुमदुमली पुण्यनगरी
-मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली, पण बारामतीच्या तरुणीला ‘जीबीएस’नं गाठलं अन्…
-कोंढव्यात ‘मुस्लिम मावळा प्रतिष्ठान’कडून शिवजयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन
-तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली