पुणे : विधानसभेच्या पराभवानंतर केंद्रातल्या पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नाना पटोले यांच्याकडून काढून घेऊन ती हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हातात घेतल्यानंतर आता राज्यात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक उलथापालथ पहायला मिळणार आहे.
येत्या १५ दिवासंमध्ये राज्यातील नवी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्य पातळीवरील कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर पुढील महिन्याभरामध्ये शहर आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी १ निरीक्षक नेमला असून कोल्हापूरच्या सतेज पाटलांकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी नुकत्याच पुण्यात विविध बैठका घेत कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चर्चा केली आहे. या बैठकामध्ये अनेक नेत्यांनी संघटनात्मक बदल सुचवले. काँग्रेसमध्ये शहरातील विविध भागांसाठी ब्लॉक अध्यक्ष नेमण्यात येतो. शहरात सध्या ५ ब्लॉक अध्यक्ष आहेत. मात्र पुणे शहराचा विस्तार वाढत गेला असला तरी ही ब्लॉक अध्यक्षांची संख्या तशीच राहिली आहे. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे किमान विधानसभा मतदारसंघनिहाय ब्लॉक अध्यक्ष असावा, अशी मागणी सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यात यश मिळवता आले नाही. त्यामुळे संघटनात्मक मोठे फेरबदल करत संघटनेत तरुणांना अधिकाधिक संधी द्यावी आणि शहराध्यक्ष देखील बदलावा, अशी मागणी देखील आता सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. शहराध्यक्ष बदलासाठी काँग्रेसच्या काही गटांनी थेट दिल्लीपर्यंत मागणी केली होती. मात्र त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ आणि त्यानंतर निरीक्षक सतेज पाटलांकडे प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहिल्यास काँग्रेसमधील विविध गट बंटी पाटील हे संघटनात्मक बदलासाठी सकारात्मक असल्याचे सांगत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-कुख्यात गुंड निल्या घायवळला पैलवानाने भर मैदानात लगावली कानशिलात; नेमकं कारण काय?
-हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार, पुण्यात नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांसाठी खुशखबर! यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीची चिंता मिटली